
रावेर (प्रतिनिधी) : येथील आशा कृषी सेवा केंद्रात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्याची घटना घडली. दुकानातून सुमारे ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुकानाचे मालक काही वेळासाठी बाहेर गेले असताना ही चोरी घडली. चोरट्यांनी दुकानातील कॅश ड्रॉवर फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. चोरीची बाब लक्षात येताच संबंधितांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



