
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाबाबत मार्च २०२५ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरात प्रक्रियेची सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या मान्यतेने पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
या अंतर्गत जामनेर तालुक्यातील गारखेडा महसूल मंडळ, अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, नगाव बु. व पातोंडा ही तीन महसूल मंडळे तसेच जळगाव शहरातील एक अशा एकूण पाच आधार संचांचे वितरण करण्यात येणार आहे.
जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यातील पात्र ‘आपले सरकार’ केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, रिक्त महसूल मंडळांची माहिती व अन्य आवश्यक तपशील प्राप्त करून घ्यावा.
इच्छुक ‘आपले सरकार’ केंद्र चालकांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


