ताज्या बातम्याआरोग्यजळगावशैक्षणिक

खान्देश–विदर्भात नेत्र व शारीरिक तपासणी शिबिरातून आरोग्य जागर; ६६ मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया

जळगाव (प्रतिनिधी): गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश व विदर्भातील विविध गावांमध्ये नेत्र व शारीरिक तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण केली जात आहे.

डॉ.उल्हास पाटील मेडिकल आणि हॉस्पिटल च्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान विविध गावांना भेट देऊन नागरिकांची नेत्र व शारीरिक तपासणी करणार आहे. या तपासणीत शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची निवड करून, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत एकूण ६६ मोतीबिंदू रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेनंतर दिनांक २३ रोजी वाढदिवसानिमित्त माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे रुग्णांशी संवाद साधणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या संपूर्ण उपक्रमासाठी आरोग्यमित्र तसेच गोडावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या आरोग्य जागर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button