राष्ट्रीय-राज्यताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या संदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिका तर्फे नियोजनात्मक बैठक संपन्न

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कल्याण–डोंबिवली महापालिकेत आढावा बैठक संपन्न

कल्याण (प्रतिनिधी): (अशोकराव चव्हाण): दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी अल्पसंख्याक विभाग व राज्यस्तरीय समागम समिती, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’ हा भव्य कार्यक्रम खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समस्त शीख, बंजारा, लबाना, सिकलगर, मोहीयाल तसेच संत नामदेव भगत परंपरेतील समाजबांधवांची आढावा बैठक दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका येथील स्थायी समिती सभागृहात पार पडली.

ही बैठक कल्याण–डोंबिवलीच्या नवनिर्वाचित महापौर मा. हर्षलीताई थविल (चौधरी) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महापालिकेचे गटनेते शशिकांतजी कांबळे, कल्याण गुरुद्वाराचे प्रमुख अमरसिंह खलसे, तांडा समृद्धी योजना ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य कैलासभाऊ तंवर, विभागीय सदस्य कैलासभाऊ पवार, जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष अशोकभाऊ चव्हाण, तसेच भिमरावजी राठोड (नायक), सुमित्राताई जाधव, सुनिताताई राठोड उपस्थित होते.

याशिवाय समाजसेवक गजाननजी राठोड, दिलीपभाऊ राठोड, सुभाष चव्हाण, गणपत राठोड, पंडित पवार, अनुलोमचे कल्याण (प.) विधानसभा क्षेत्रातील भागजनसेवक सुशांतजी शेलार, आरोग्य विभागाचे प्रशांतजी गव्हाणकर, परिवहन विभागाचे दिपकजी चौधरी तसेच विविध विभागांचे अधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नियोजन, समन्वय व जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button