जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय आयटीआय, जळगाव येथे विभागस्तरीय तंत्र प्रदर्शन

जळगाव (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे विभागस्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत संस्थेच्या प्रांगणात होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (महाराष्ट्र राज्य, मुंबई), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक-०२, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुहास गाजरे, डॉ. पराग पाटील, संदीप गायकवाड, जितेंद्र जैन, मानस बोरोले, निखील घोलप, संदीप बंब, सागर येवले, दिपक चौधरी व किशोर पाटील उपस्थित राहणार आहेत.

या तंत्र प्रदर्शनात नाशिक विभागातील ५० आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी आपल्या नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्पांची मांडणी करणार आहेत. कौशल्याधारित शिक्षण, तांत्रिक नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसह तसेच नागरिकांनी या तंत्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक अनिल गावीत, उपसंचालक राजेश मानकर व मनिषा बोरुडकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी. पी. चव्हाण, तसेच संस्थेचे प्राचार्य योगेश कुलकर्णी व उपप्राचार्य नितीन चौधरी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button