
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या निवडीचे अधिकृत निर्देश दिले असून, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगावसह नाशिक, धुळे आणि अहिल्यानगरमध्येही ६ फेब्रुवारीलाच ही प्रक्रिया पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर आता जळगावच्या नव्या महापौरांच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.




