वर्सी महोत्सवात मंत्री महाजन यांनी घेतले दर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगावात सुरू असलेल्या वर्सी महोत्सवानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत कंवरराम साहेब, संत बाबा हरदासराम साहेब आणि संत बाबा गेलाराम साहेब यांसारख्या संतांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव शहरात वर्सी महोत्सव हा सिंधी समाजाद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. यात संत कंवरराम साहेब, संत बाबा हरदासराम साहेब आणि संत बाबा गेलाराम साहेब यांसारख्या संतांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संत बाबा हरदास राम गोधडीवाला सेवा मंडळ जळगाव आयोजित 34 व्या वर्सी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे.
या उत्सवात देशभरातून आणि परदेशातूनही सिंधी भाविक सहभागी होतात. या वर्सी महोत्सवानिमित्त भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थना केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रकाश बालानी, गोपाल पोपटानी, रमेश मतानी, विनोद मराठे, गजानन वंजारी यांच्यासह सिंधी बांधव आणि इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.




