आरोग्यअभिवादनक्रीडाजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशैक्षणिक

नाशिक विभागीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत अर्णव, गौतम व जयदीप यांचे घवघवीत यश

कोळगाव, ता.भडगाव (प्रतिनिधी) : कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलीत गोपीचंद पुना पाटील, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव, ता.भडगाव येथील तथा किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे खेळाडू अर्णव संदीप खैरणार याने ४०० मी.धावणे प्रकारात प्रथमस्थान तर गौतम गोपाल पाटील याने ८०० मी.धावणे या क्रीडा प्रकारात दुसरे तर १५०० मी.धावणे यात तृतीय स्थान प्राप्त केले आहे. तसेच जयदीप कैलास सोनवणे याने १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय स्थान प्राप्त केले आहे. या विभागीय मैदानी स्पर्धा स्व.मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे पार पडल्या.

अर्णव व गौतम यांची डेरवण ता. चिपळूण जि.रत्नागिरी येथे ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत घवघवीत यश मिळवणाऱ्या ॲथेलिट्सना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय *नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील, मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील, प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षिका सिमा शिसोदे तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button